
विंडिज क्रिकेट बोर्डाच्या व्यवस्थापनावर पंड्याने व्यक्त केली नाराजी
विंडिज दौऱ्यादरम्यान(IND vs WI) दिल्या गेलेल्या सुविधांबाबत भारतीय संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याने वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाच्या व्यवस्थापनावर नाराजी व्यक्त केली. वेस्ट इंडिज बोर्डाने प्रवासासारख्या गोष्टींकडे थोडे अधिक लक्ष दिले पाहिजे. खेळाडूंना मूलभूत सुविधा दिल्या पाहिजेत, असे पंड्या म्हणाला.
पंड्या म्हणाला की, एकदिवसीय मालिकेच्या आधी विमानाला ४ तास उशीर झाल्याची तक्रारही अनेक वरिष्ठ खेळाडूंनी बीसीसीआयकडे केली होती. त्यामुळे सामन्यापूर्वी खेळाडूंना पुरेशी झोप घेता आली नाही. पुढच्या वेळी आम्ही वेस्ट इंडिजमध्ये आलो, तर परिस्थिती सुधारण्याची आशा करतो. वेस्ट इंडीज बोर्डाने प्रवासासारख्या गोष्टींकडे थोडे अधिक लक्ष दिले पाहिजे. आम्ही चैनीची मागणी करत नाही, तर मूलभूत सुविधा दिल्या पाहिजेत.
आपल्या अर्धशतकीय खेळीबद्दल हार्दिक म्हणाला की, 'मला फलंदाजी करताना मैदानात टिकायचे होते. मी सामन्यापूर्वी विराट कोहलीशी बोललो. त्याने मला खेळपट्टीवर थोडा वेळ घालवण्यास सांगितले आणि ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये जुळवून घेण्याचा सल्ला दिला.