Wednesday, May 7, 2025

देशताज्या घडामोडी

Pakistan's Donkey: पाकिस्तानवर गाढवं विकण्याची वेळ! तीही चीनला…

Pakistan's Donkey: पाकिस्तानवर गाढवं विकण्याची वेळ! तीही चीनला…

काबुल: आर्थिक संकटाचा (Pakistan Economic Crisis) सामना करत असलेल्या पाकिस्तानची (Pakistan) अर्थव्यवस्था गाढवं (Donkey) सांभाळतील, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कंगाल पाकिस्तानवर आता गाढवं विकण्याची वेळ आली आहे. चीन (China) पाकिस्तानकडून ही गाढवं खरेदी करणार आहे.

पाकिस्तानच्या गाढवांचे देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचं योगदान आहे. हा विनोद नसून खरी परिस्थिती आहे. पाकिस्तान चीनला गाढवे विकतो. चीनमध्ये गाढवाच्या कातडीला खूप मागणी आहे, त्यामुळे गाढवाची मागणी जास्त आहे. चीनमध्ये गाढवांची संख्या कमी असल्याने चीनला पाकिस्तान, आफ्रिकेसारख्या इतर भागातून गाढवं आयात करावी लागतात. सध्या पाकिस्तान कंगाल झाला असून देशाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहे. अशात चीनची मागणी पाकिस्तानसाठी आधार ठरु शकते. यामुळे पाकिस्तानने चीनला गाढवं आयात करण्याचा निर्णय घेतला आहे.

Comments
Add Comment