
कोलोरॅडो : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन एका कार्यक्रमादरम्यान स्टेजवर घसरुन पडले. कोलोरॅडोमध्ये यूएस एअर फोर्सच्या पदवीदान समारंभात ही घटना घडली. यापूर्वीही ते पाचवेळा खाली कोसळले होते.
BREAKING: President Biden takes a fall on stage at the U.S. Air Force Academy graduationpic.twitter.com/BLef4F8eby
— The Spectator Index (@spectatorindex) June 1, 2023
कोलोरॅडोमध्ये यूएस एअर फोर्सच्या पदवीदान समारंभात अखेरची पदवी दिल्यानंतर बायडेन आपल्या जागेकडे जात होते. यावेळी जाताना त्यांचा पाय वाळूच्या पिशवीवर पडला अन् ते घसरले.
Joe Biden trips, falls at US Air Force Academy graduation ceremony
Read @ANI Story | https://t.co/wq98jGF932#JoeBiden #Colorado #USAirForceAcademy pic.twitter.com/iEnfqXp5RH — ANI Digital (@ani_digital) June 1, 2023
व्हाईट हाऊसने एका निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्राध्यक्ष बायडेन ठीक आहेत. व्हाईट हाऊसचे कम्युनिकेशन डायरेक्टर बेन लाबोल्ट यांनी ट्विट केले आहे की, अध्यक्ष ठीक आहेत आणि त्यांना दुखापत झालेली नाही.
या कार्यक्रमाच्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, बायडेन उभे राहताच त्यांनी बोटाने स्टेजकडे इशारा केला. तेथे काळ्या रंगाची वाळूने भरलेली पिशवी होती. यामध्ये बायडेन यांचा पाय अडकल्यामुळे त्यांचा तोल गेला आणि ते खाली पडले.
बायडेन हे अमेरिकेत अध्यक्षपद भूषवणारे सर्वात वयस्कर नेते आहेत. ८० वर्षीय डेमोक्रॅट नेत्याने २० जानेवारी २०२१ रोजी राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करून त्यांनी अमेरिकेची सत्ता मिळवली होती. २०२४ मध्ये ते पुन्हा निवडणूक लढवणार आहेत.
दरम्यान, बायडेन यांना दुखापत झाली नसली तरी, या घटनेचा व्हिडिओ मात्र व्हायरल झाला आहे.