Tuesday, May 6, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

तुम्ही माझ्यामागे मोक्का लावून चांगलं काम केलं

तुम्ही माझ्यामागे मोक्का लावून चांगलं काम केलं

गिरिश महाजन यांनी एकनाथ खडसेंवर केली खोचक टीका

जळगाव: भाजपचे संकटमोचक अशी ओळख असणाऱ्या ग्रामविकास मंत्री आणि जळगावातील पक्षाचे प्रमुख नेते गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. गिरीश महाजन यांनी माझ्या मागे ‘ईडी’लावली म्हणून त्यांच्यामागे मोक्का लावण्यात आला असल्याची टीका एकनाथ खडसे यांनी केली होती. त्यावर गिरिश महाजन यांनी बोलताना तुम्ही माझ्यामागे मोक्का लावून चांगलं काम केलं, असं म्हटलं आहे.

गिरीश महाजन यांनी म्हटलं. मी तर तुमच्यावर कुठलेही आरोप केलेले नाहीत, जे आरोप केले आहेत ते अंजली दमानिया यांनी केलेले आहेत म्हणूनच तुमची चौकशी झालेली आहे. आपला जावई जवळपास दोन-तीन वर्षापासून जेलमध्ये आहे, त्यांना जामीन मिळत नाही. आपलं कुटुंबीय कोर्टाने थांबवलं म्हणून सध्या बाहेर आहेत, त्याची कल्पना तुम्हाला आहे. म्हणून तुम्ही माझ्यावर तो मोक्का लावला तो कसा लावला त्याची कल्पना मला आहे. तुमच्या मागे ईडी लागली आहे, हे सर्व लोक बघत आहेत. त्याचे पुरावे देखील आहेत. दहा दहा वेळा सुप्रीम कोर्टात जाऊन तुम्हाला त्यात जामीन मिळत नाही. तुमचा जावई हा गरीब माणूस आहे तो तुमच्यामुळे अडकला आहे. तुमच्या स्वार्थापायी त्याला अडकवण्यात आलं याचं दुःख मलाही आहे, असा पलटवारह गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर केला आहे.

Comments
Add Comment