
मुंबई (प्रतिनिधी) : गेल्या कित्येक वर्षांपासून दुरुस्तीसाठी बंद असलेल्या आंबेत पुलामुळे आंबेत-म्हाप्रळ मार्गावरील एसटी बसगाड्यांना मोठा वळसा घालून मंडणगड व दापोली तालुक्यात जावे लागत होते. आंबेत खाडीतून सुरू असलेल्या रो रो सेवेमुळे इतर वाहने खाडी पार करून जाऊ शकत होती. मात्र एसटी बस गाड्यांना ती मुभा मिळत नव्हती. आता एसटी महामंडळाच्या काही बससेवा या मार्गावरून फेरीबोटीतून खाडी पार करू शकणार आहेत. राज्यात प्रथमच असा प्रयोग होत असल्यामुळे प्रवाशांमध्ये मोठी उत्सुकता दिसून येत होती. या सेवेमुळे प्रवाशांचा मोठा वेळ वाचणार असून पैशाचीही बचत होणार आहे.
या बस आंबेत-म्हाप्रळ मार्गावरील रो रो सेवेने जातील : ( ५. ३० मुंबई - दापोली , शयनयान बस) (६. १५ बोरिवली - बोरथल), (६. ३० नालासोपारा - तिढे) (६. ३० मुंबई - दाभोळ), (६. ३० बोरिवली - दापोली) (७. ०० शिर्डी - दापोली) (७ . ०० विठ्ठलवाडी - दापोली) (७. ३० नाशिक - दापोली) (७. ३० नालासोपारा - दापोली) (९. ३० बीड - मंडणगड) (९. ३० मुंबई - पिंपळोली) (९. ४५ शिर्डी - मंडणगड) (१३. ०० मुंबई - दापोली) (१६. ०० मुंबई - मंडणगड) (१९. ३० पनवेल - मंडणगड).
- ०६. ०० दापोली - मुंबई
- ०६. ३० दापोली - नाशिक
- ०७. ०० दापोली - शिर्डी
- १०. ०० दापोली - बोरिवली
- ११. १० दाभोळ - मुंबई
- २१. ०० दापोली - नालासोपारा
- २१. ०० दापोली - विठ्ठलवाडी
- २२ . ३० दापोली - मुंबई
- ०६. ०० मंडणगड - बीड
- ०६. १५ पिंपळोली - मुंबई
- ०७. ०० केळशी - नालासोपारा
- ०७. ४५ मंडणगड - शिर्डी
- ०७. ४५ तिढे - नालासोपारा
- ०८. ०० खरवते - नालासोपारा
- ०८. १५ तिढे - बोरिवली
- १०. १५ मंडणगड - बोरिवली
- ११. १५ बोरथल - बोरिवली
- १३. ०० मंडणगड - पनवेल
- १६. ०० मंडणगड - मुंबई
- १९. ४५ सावरी - नालासोपारा