Tuesday, May 6, 2025

देशमहत्वाची बातमी

यंदा मान्सून उशिरा दाखल होणार!

स्कायमेटची माहिती

मुंबई : यंदा मान्सून अंदमानमध्ये उशिराने दाखल होण्याचा अंदाज स्कायमेट वेदर या खासगी संस्थेने वर्तवला आहे. मान्सून अंदमानमध्ये साधारणत: २२ मे रोजी दाखल होत असतो. मात्र यंदा त्याची सुरुवात कमकुवत दिसत आहे. त्यामुळे यंदा मान्सून अंदमानमध्ये विलंबाने दाखल होण्याचा अंदाज स्कायमेटच्या शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे. तसेच केरळात नैऋत्य मान्सून साधारणपणे १ जून रोजी दाखल होत असतो, मात्र नैऋत्य मान्सूनसंदर्भात आताच सांगणो कठिण असल्याचे मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे.

तर भारतीय हवामान विभागाकडून पुढील एक ते दोन दिवसात अंदमानात मान्सून कधीपर्यंत दाखल होईल या संदर्भातली माहिती दिली जाणार आहे.

स्कायमेटकडून यंदाचा मान्सून सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर भारतीय हवामान विभागाकडून यंदाचा मान्सून सर्वसाधारण राहण्याचा अंदाज जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी उत्तरेकडे जूनपर्यंत उष्ण हवामान कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पेरणीला देखील उशील होऊ शकतो.

तसेच वेगारीस ऑफ द वेदरकडून केरळात मान्सून उशिरा दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ४ जूनपर्यंत मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रात ९ तारखेपर्यंत आणि मुंबईत १५ जूनपर्यंत मान्सूनचे आगमन होणार असल्याचे भाकित वेगारीस ऑफ द वेदरने वर्तवले आहे.

दरम्यान दक्षिण भारतीय महासागर परिसरात एक चक्रीवादळ तयार होत असल्याने बाष्प तिकडे ढकलले जातील. अशात मादागास्कर परिसरात उच्च दाब तयार होण्यास आणखी काही दिवस लागण्याची शक्यता अशात मान्सूनचे ढग तयार होण्यास उशीर होण्याचा अंदाज आहे.

मान्सूनची नियमित वाटचाल अशी असते...

२२ मे - अंदमान

०१ जून - केरळ

०७ जून - महाराष्ट्र

११ जून - मुंबई

Comments
Add Comment