Sunday, May 11, 2025

देशताज्या घडामोडी

सीबीएसई बारावी बोर्डाचा निकाल जाहीर

सीबीएसई बारावी बोर्डाचा निकाल जाहीर नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) इयत्ता १२वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर केला. बारावीच्या निकालात एकूण ८७.३३% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. १५ फेब्रुवारी ते ५ एप्रिल २०२३ या कालावधीत घेण्यात आलेल्या या परीक्षेसाठी सुमारे १६.९ लाख विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ७.४ लाख महिला विद्यार्थीनी तर ९.५१ लाख पुरुष विद्यार्थी आणि ५ विद्यार्थी 'इतर' श्रेणीत नोंदणीकृत आहेत. ३६ दिवसांत एकूण ११५ विषयांसाठी परीक्षा घेण्यात आल्या होत्या. यांचे निकाल आता सीबीएसईच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. विद्यार्थी results.cbse.nic.in आणि cbseresuts.nic.in. या अधिकृत संकेतस्थळांवर निकाल पाहू शकतात. या संकेतस्थळांव्यतिरिक्त विद्यार्थी बोर्ड परीक्षेचे निकाल तपासण्यासाठी DigiLocker, UMANG प्लॅटफॉर्म देखील वापरू शकतात. २०२३ च्या CBSE इयत्ता १०च्या निकालाची तारीख आणि वेळ अजून जाहीर झालेले नाहीत.
Comments
Add Comment