
मुंबई (प्रतिनिधी) : देशभरातील विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यासाठी एक खिडकी सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हावी म्हणून विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने केंद्रीय विद्यापीठ प्रवेश परीक्षा येत्या ५ जूनपासून सुरू होणार असल्याची घोषणा यूजीसीचे अध्यक्ष एम. जगदेश कुमार यांनी केली आहे. ही परीक्षा घेण्याची राष्ट्रीय चाचणी संस्थेची म्हणजे ‘एनआयए’ची स्थापना करण्यात आली आहे. केंद्रीय पातळीवर सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना देशभरातील मान्यताप्राप्त विद्यापीठांमध्ये प्रवेश घेता यावे म्हणून एक सीयूईटी परीक्षा घेण्याचे निर्णय घेण्यात आले आहे. त्यानुसार ५ ते १२ जूनदरम्यान या परीक्षा होतील. या कालावधीत सर्व दिवशी परीक्षांसाठी विद्यार्थी cuet.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करू शकतात.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने विद्यापीठांतील प्रवेश पद्धती स्वायत्त आणि स्वयंपूर्ण व्हावी यासाठी राष्ट्रीय चाचणी संस्थेची म्हणजे ‘एनआयए’ची स्थापना केली. त्यामार्फत केंद्रीय विद्यापीठ प्रवेश परीक्षा (सीयूईटी) आयोजित करण्याचे काम सोपवण्यात आले आहे.