Thursday, May 8, 2025

ताज्या घडामोडीनाशिक

नाशिकध्ये ६०४ किलो वजनाची भांग जप्त

नाशिकध्ये ६०४ किलो वजनाची भांग जप्त

नाशिक: नाशिकमधील शालिमार येथील वावरे लेन परिसरात अंमली पदार्थ विरोधी पथकाने ६०४ किलो भांग जप्त केली आहे. याप्रकरणी पथकाने दोन आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याविरोधात भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

आडगाव शिवार येथील म्हाडा कॉलनीत राहणाऱ्या पवन सुकदेव वाडेकर (वय २५ वर्षे) व वावरे लेन येथे राहणाऱ्या ज्ञानेश्वर बाळू शेलार (वय २८ वर्षे) यांना पथकाने ताब्यात घेत चौकशी केली. त्यावेळी दोघांकडे ६०४ किलो ३०० ग्रॅम वजनाचा भांगचा साठा आढळून आला. या साठ्याची किंमत ३ लाख ३० हजार १५३ रुपये इतकी आहे.

पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिलेल्या आदेशानुसार अंमली पदार्थ विक्री, खरेदी, वाहतूक व साठेबाजी रोखण्यासाठी नियुक्त केलेल्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली. पथकातील पोलिस अंमलदार बाळासाहेब नांद्रे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे वावरे लेन येथे दोघे भांग हा मादक पदार्थ विक्री करत असल्याचे समजले. त्यानुसार माहितीची खात्री करून गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक डॉ. अंचल मुद्गल यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक हेमंत नागरे, एच. के. नागरे, पी. बी. सुर्यवंशी, अंमलदार नांद्रे, गणेश भामरे, देवकिसन गायकर, रंजन बेंडाळे, विनायक आव्हाड, भारत डंबाळे, नितीन भालेराव आदींच्या पथकाने वावरे लेन येथे सापळा रचून कारवाई केली.

Comments
Add Comment