Wednesday, May 7, 2025

देशविदेशमहत्वाची बातमी

भारत - पाकिस्तान अणुयुद्ध कोणी रोखले?

भारत - पाकिस्तान अणुयुद्ध कोणी रोखले?

सुषमा स्वराज यांचा एक फोन आला आणि पाकिस्तानचा भारतावर अणुबॉम्ब टाकायचा डाव पुरता फसला असा खळबळजनक दावा अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पियो यांनी केला आहे. स्वराज यांनी प्रसंगावधान दाखवले नसते तर मोठा अनर्थ घडला असता असा गौप्यस्फोट पॉम्पियो यांनी केला आहे.

दरम्यान पॉम्पियो यांच्या या दाव्यामुळे पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर पुन्हा एकदा समोर आला आहे. पॉम्पियो यांनी ‘नेव्हर गिव्ह अ‍ॅन इंच : फायटिंग फॉर द अमेरिका आय लव्ह’ या पुस्तकात याची माहिती दिली आहे. ते लिहितात- २७-२८ फेब्रुवारी २०१९ हे दोन दिवस मी अमेरिका – उत्तर कोरिया शिखर संमेलनमध्ये होतो. त्याचवेळी आम्हाला सुषमा स्वराज यांनी एक माहिती दिली. भारत - पाकिस्तान अणुयुद्धाच्या दिशेने वाटचाल करत होते. ते संकट टाळण्यासाठी आम्ही रात्रभर जागे होतो. दिल्ली आणि इस्लामाबादमधील संबंधितांशी चर्चा करत होतो. जगाला त्या रात्रीविषयी कळले पाहीजे.

सुषमा स्वराज यांनी नेमके काय केले?

या प्रसंगाची आठवण नमुद करताना पॉम्पियो यांनी सुरुवातील पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याची माहिती दिली. ज्यामध्ये भारताच्या ४० जवानांना वीरगती प्राप्त झाली होती. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने बालाकोटमध्ये सर्जिकल स्ट्राईक केला होता. या स्ट्राईकनंतर पाकिस्तानची झोप उडाली. त्यांनी सर्जिकल स्ट्राईकच्या बदल्यात अणुबॉम्ब टाकण्याचा प्लान केला. पॉम्पियो म्हणाले की, भारताच्या तत्कालिन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आपल्याला झोपेतून उठविले होते. पाकिस्तानने हल्ला केल्यास प्रतिहल्ल्याची भारतही सज्ज होत असल्याचे स्वराज यांनी सांगितल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.

पॉम्पियो यांना तात्काळ अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्याशी संवाद साधला आणि त्यानंतर पाकिस्तानचे सेनाप्रमूख जनरल कमर जावेद बाजवा यांच्याशीही चर्चा केली. बाजवा यांनी सुरुवातील अणुयुद्धाची शक्यता फेटाळून लावली. पॉम्पियो यांनी त्यांची समजूत काढली आणि भारताला माहिती दिली की पाकिस्तान अणुयुद्धाची तयारी करत नाही.

Comments
Add Comment