Wednesday, May 7, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

Anjali Damania : अत्यंत नीच दर्जाचे राजकारण : अंजली दमानिया

मुंबई : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांची बाजू उचलून धरत हा सर्व प्रकार अत्यंत नीच पातळीवरील राजकारण असल्याची टीका केली आहे. त्या सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

Molestation : विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच आव्हाडांचा आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा

यावेळी अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या विनयभंगाचा गुन्हा अयोग्य असल्याचे सांगितले. महाराष्ट्रातील राजकारणात एकमेकांवर सध्या अतिश्य लाजिरवाणे आरोप होऊ लागले आहेत. मला राष्ट्रवादी काँग्रेस आणि जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल जराही आस्था नाही. पण मी कालचा व्हिडिओ दहावेळा पाहिला. तिथे जितेंद्र आव्हाड यांच्याकडून विनयभंगासारखी कुठलीही कृती झालेली नाही. त्यामुळे संबंधित महिलेने जितेंद्र आव्हाड यांनी अमूक ठिकाणी हात लावला, माझा विनयभंग केला, हे म्हणणे चूक आहे, असे अंजली दमानिया यांनी म्हटले. महाराष्ट्रात सध्या अत्यंत खालच्या दर्जाचे राजकारण सुरु आहे. हे नीच राजकारण थांबले पाहिजे, अशी पुस्तीही दमानिया यांनी जोडली.

Comments
Add Comment