
मुंबई : राज्याचे दसरा मेळाव्याकडे लक्ष लागले आहे. अशातच सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. दरम्यान, मनसेचे नेते गजानन काळे यांनी शिवसेनेला ट्विट करत खोचक टोला लगावला आहे. त्यांचे हे ट्विट जोरदार वायरल होत आहे.
"मर्द, छाताड बॉम्ब, बाप पळवणारी टोळी बॉम्ब; टोमणे मेळाव्याचे भाषण तयार, हसा चकट फु..." असे म्हणत शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर मनसेचे काळे यांनी हल्लाबोल केला आहे.
काळे यांनी एक व्यंगचित्र शेअर केले आहे. ज्यामध्ये हसऱ्या मेळाव्याची तयारी सुरू असे म्हटले आहे.
https://twitter.com/GajananKaleMNS/status/1577508494156058624गजानन काळे यांनी केलेल्या ट्विटमध्ये "साहेब आजच्या भाषणात कोणते मुद्दे असतील? त्यावर उद्धव ठाकरे यांनी त्याचीच तयारी सुरू आहे. डिस्टर्ब करू नका असे म्हटले आहे. तसेच टोमणे बॉम्ब, पाठीत खंजीर कोथळा बॉम्ब, मावळे कावळे बॉम्ब, मर्द छाताड बॉम्ब, बाप पळवणारी टोळी बॉम्ब" असे देखील म्हटले आहे.