Thursday, May 8, 2025

देशमहत्वाची बातमी

कोविड लसीकरणाने पार केला २०१.९९ कोटीचा टप्पा

कोविड लसीकरणाने पार केला २०१.९९ कोटीचा टप्पा

नवी दिल्ली (हिं.स) : भारताची कोविड-१९ लसीकरणाची व्याप्ती २०१.९९ कोटीहून अधिक पर्यंत पोहचली आहे. २,६६,५४,२८३ सत्रांच्या माध्यमातून हे यश साध्य झाले. आतापर्यंत, ३.८५ कोटींहून अधिक मुलामुलींना कोविड-१९ विरोधी लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे.

भारतात सध्या उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या १ लाख ५२ हजार २०० इतकी असून अशा रूग्णांची संख्या देशातील एकूण पॉझिटिव्ह रूग्णांच्या ०.३५ टक्के इतकी आहे. भारताचा कोविडमधून रूग्ण बरे होण्याचा दर ९८.४५ टक्के आहे. गेल्या २४ तासांत ९८.४५ टक्के रूग्ण बरे झाले असून बरे झालेल्या रूग्णांची एकत्रित संख्या सध्या ४,३२,१०,५२२ इतकी आहे. गेल्या २४ तासांत देशभरात २०,२७९ नवीन रूग्णांची नोंद झाली.

गेल्या २४ तासांत, एकूण ३,८३,६५७ इतक्या कोविड-१९ चाचण्या करण्यात आल्या असून भारतामध्ये आतापर्यंत ८७.२५ कोटींपेक्षा जास्त चाचण्या करण्यात आल्या. देशात साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या ४.४६ टक्के इतका असून दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर ५.२९ टक्के नोंदवला गेला. केंद्र सरकारने सुमारे १९४.१७ कोटींहून जास्त लस-मात्रा राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना (मोफत) आणि थेट राज्याद्वारे खरेदी प्रक्रियेच्या माध्यमातून उपलब्ध केल्या आहेत. ७.९८ कोटींहून अधिक न वापरलेल्या उपयुक्त लस-मात्रा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे अद्याप शिल्लक आहेत.

Comments
Add Comment