
रत्नागिरी (हिं.स.) : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा भावी खासदार भाजपचाच असेल, असा ठाम विश्वास भाजपचे नेते आशीष शेलार यांनी रत्नागिरी दौऱ्याच्या वेळी व्यक्त केला. शेलार दोन दिवसांच्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत.
यावेळी त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी भाजपाची पुढची रणनिती स्पष्ट केली. शेलार म्हणाले, यापुढे काँग्रेस राष्ट्रवादी-काँग्रेस एकत्र लढले तरी त्याचा कोणताही परिणाम भाजपावर होणार नाही.
दरम्यान, माजी मंत्री आमदार उदय सामंत यांच्या पाली येथील निवासस्थानी होणाऱ्या तथाकथित भेटीच्या वृत्ताचे खंडन केले. रत्नागिरी शहरातील एका व्हॉट्सअप ग्रुपवर शेलार आज दुपारी साडेतीन वाजता सामंत यांची त्यांच्या पाली येथील निवासस्थानी भाजप पदाधिकाऱ्यांसोबत भेट घेणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताचे शेलार यांनी खंडन केले. अशा प्रकारची कुठलीच भेट झालेली नाही किंवा ठरलेलीही नाही, असेही ते म्हणाले.