Tuesday, May 6, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कृषी विद्यापीठाची ''डॉक्टर ऑफ सायन्स'' पदवी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कृषी विद्यापीठाची ''डॉक्टर ऑफ सायन्स'' पदवी

अकोला (हिं.स.) : केंद्रीय वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांना अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वतीने डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी प्रदान करण्यात येणार आहे.

राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या हस्ते नितीन गडकरी यांना पदवी प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी आज शेतकरी सदन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

अकोला येथील डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा ३६ दीक्षांत समारंभ गुरुवारी ७ जुलै रोजी होणार आहे. या समारंभात समारंभात कृषीच्या विविध शाखांमधून अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या ३२३४ स्नातकांना पदवी आणि ३८१ स्नातकाना पदव्युत्तर पदवी प्रदान केली जाणार असल्याची माहितीही परिषदेतून देण्यात आली.

Comments
Add Comment