
मुंबई (प्रतिनिधी) : प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेने विविध पायाभूत सुविधांच्या सुधारणा आणि वाढीची कामे यशस्वीपणे हाती घेतली आहेत. याच्याच पुढे जाऊन, वांद्रे टर्मिनसवरून येणाऱ्या आणि निघणाऱ्या बाहेरच्या गाड्यांमधील प्रवाशांच्या सोयीसाठी, खार रोड स्थानकपासून ते वांद्रे टर्मिनस आणि उपनगरीय नेटवर्कला जोडणारा नवीन पादचारी पूल कार्यान्वित केला आहे.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर म्हणाले की, १ जुलै २०२२ पासून वांद्रे टर्मिनस आणि खार रोडदरम्यान नवीन पादचारी पूल कार्यान्वित करण्यात आला आहे. या नवीन पादचारी पुलाची लांबी ४.४ मीटर रुंद आणि ३१४ मीटर अशी आहे.
या नवीन पादचारी पुलाचा उपयोग बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी उपयोगी ठरणार आहे. प्रवासी खार रोड स्टेशनवर उतरून आणि पादचारी पुलाशी जोडलेले खार स्थानाकावरून वांद्रे टर्मिनसच्या कोणत्याही प्लॅटफॉर्मवर पोहोचू शकतात. या आर्थिक वर्षात पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरी विभागात एकूण सात पादचारी पूल कार्यान्वित करण्यात आले आहेत.