
मुंबई : विवेक फणसाळकर यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे उद्या निवृत्त होणार आहे. आता त्यांच्या जागी फणसळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबई पोलिस आयुक्तपद हे राज्यातील सर्वांत मानाचे पद मानले जाते. मुंबई पोलीस महासंचालक रजनीश सेठ, विवेक फणसळकर, पुण्याचे पोलीस आयुक्त अभिताभ गुप्ता यांची नावे चर्चेत होती. अखेर फणसळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
फणसाळकर यांची ३१ जुलै २०१८ रोजी ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाली होती, त्यांची ठाण्यातील उत्तम कामगिरी पाहता राज्य शासनाने त्यांची बदली न करता मुदतवाढ दिली होती. सुमारे पावणे दोन वर्ष त्यांनी ठाणे शहर आयुक्त पदाचा कार्यभार सांभाळला. त्यांचा कार्यकाळ २०१८ साली संपुष्टात आला होता.