Monday, May 5, 2025

महामुंबई

बेस्टची पर्यावरणपूरक ई-बाईक सेवा

बेस्टची पर्यावरणपूरक ई-बाईक सेवा

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईकराच्या सोयीसाठी बेस्टतर्फे पर्यावरणपूरक नवीन ई-बाईक सेवा सुरू करण्यात आली आहे. मुंबईकरांना एंड-टू-एंड इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्टेशन सोल्यूशन ऑफर करण्याच्या दृष्टीकोनाच्या उद्दिष्टाने ई-बाईक सेवा सुरू केली आहे. मुंबईकरांसाठी ही बेस्टची ई-बाईक वाहतूक सोयीस्कर ठरणार आहे.

ई-बाईक सेवेसाठी Vogo अॅप डाउनलोड करणे आणि त्यांची ऑनलाइन नोंदणी पूर्ण करणे आवश्यक आहे. ई-बाईकचे भाडे अत्यंत क्षुल्लक आहे.

ई-बाईकची मुख्य खासीयत म्हणजे इतर बाईकप्रमाणे वायू किंवा ध्वनी प्रदूषण होणार नाही. या ई-बाईकची १,५०० वॅट्स इतकी बॅटरी पॉवर आहे. ई-बाईकचा वेग २५ किमी/तास इतका मर्यादित आहे. त्यामुळे अपघातांच्या प्रमाणातही घट होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment