
मुंबई : माजी केंद्रीय मंत्री आणि जेष्ठ काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी महाराष्ट्र राज्याच्या राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे.
नुकतेच ते तामिळनाडू राज्यातून राज्यसभेवर निवडून आल्यानंतर, महाराष्ट्र राज्यातून राज्यसभा जागेचा राजीनामा देणे आवश्यक झाले होते. त्यानुसार पी चिदंबरम यांनी महाराष्ट्रच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. राज्यसभेच्या अध्यक्षांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे.
https://twitter.com/PChidambaram_IN/status/1537345260765913088महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करण्याचा सन्मान प्राप्त झाला तसेच महाराष्ट्रातील जनतेला भविष्यात शांतता आणि समृद्धी साठी शुभेच्छा देतो असे पी चिदंबरम ट्वीटर द्वारे म्हणाले.