Monday, May 5, 2025

क्रीडाताज्या घडामोडी

आयर्लंड दौऱ्यात हार्दिक पंड्याकडे कर्णधारपदाची कमान

आयर्लंड दौऱ्यात हार्दिक पंड्याकडे कर्णधारपदाची कमान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका संपल्यानंतर भारतीय संघ आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. भारत आणि आयर्लंड यांच्यात २६ जूनपासून दोन सामन्यांची टी-२० मालिका होणार आहे.

या मालिकेसाठी गुजरात संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याकडे भारतीय संघाच्या नेतृत्वपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

महाराष्ट्राच्या राहुल त्रिपाठीला संघात संधी मिळाली आहे. याशिवाय सूर्यकुमार यादव, संजू सॅमसनचेही संघात पुनरागमन झाले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची पाच सामन्यांची टी-२० मालिका १९ जून रोजी संपल्यानंतर भारतीय संघ २६ जूनपासून आयर्लंडविरुद्ध दोन सामन्यांची टी-२० मालिका खेळेल. या मालिकेसाठी नुकतीच संघाची घोषणा करण्यात आली.

Comments
Add Comment