
जम्मू (हिं.स.) : सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी रविवारी रात्री जम्मूच्या बाहेरील अरनिया सेक्टरच्या आंतरराष्ट्रीय सीमेजवळ काही घुसखोर भारतीय सीमेत घुसताना पाहिले. सैनिकांनी त्यांना परत जाण्यास सांगितले. पण तो मान्य न करता भारतीय हद्दीत घुसू लागला. हा सर्व प्रकार पाहून जवानांनी गोळीबार सुरू केल्यानंतर ते पळून गेले.
याबाबत आज, सोमवारी माहिती देताना बीएसएफच्या प्रवक्त्याने सांगितले की, बीएसएफच्या जवानांनी काही घुसखोरांना अरनिया सेक्टरच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरून या बाजूने प्रवेश करताना पाहिले. सतर्क असलेल्या बीएसएफच्या जवानांनी त्याच्यावर गोळीबार केला आणि तो पळून गेला. सोमवारी सकाळी जवानांनी परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे.