
मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘राज्यसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला आपली जागा दाखविली आहे. निवडणूक कशी जिंकायची ती फडणवीस यांनी शिकविली आहे. फडणवीस यांनी तिसरी जागा जिंकून बड्या बड्या वाघांची मान झुकविली आहे,’ असे म्हणत रामदास आठवले यांनी महाविकास आघाडीवर ट्विटरद्वारे निशाणा साधला आहे.
https://twitter.com/RamdasAthawale/status/1535540254366572544दरम्यान, राज्यसभेसाठीची सहावी जागा भाजपा आणि शिवसेना अशा दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची केली होती. या सहाव्या जागेसाठी भाजपाने धनंजय माहडिक तर शिवसेनेने संजय पवार यांना उमेदवारी दिली होती. कोणत्याही परिस्थितीत ही जागा आम्हीच जिंकू असा दावा भाजपा आणि महाविकास आघाडीकडून केला जात होता.
प्रत्यक्षात मात्र या जागेवर भाजपाचे धनंजय महाडिक यांनी बाजी मारली. छोटे पक्ष तसेच अपक्ष आमदारांनी महाडिक यांना मतदान केले. महाडिक यांना ४१ मते मिळाली तर संजय पवार यांना ३३ मते मिळाली.