Saturday, May 10, 2025

ठाणेमहत्वाची बातमी

उल्हासनगरात अनधिकृत होर्डिंग, बॅनरबाजीला बसणार चाप

सोनू शिंदे

उल्हासनगर : उल्हासनगर शहराची विद्रुपीकरणातून सुटका करण्यासाठी उल्हासनगर महानगरपालिकेने एक पाऊल पुढे टाकले असून यापुढे अनधिकृत होर्डिग्ज, बॅनर बाजीला चाप बसवण्यासाठी थेट एफआयआर दाखल करण्याचा निर्णय घेतल्याने अनधिकृत बॅनरबाजी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

उल्हासनगरात राजकीय पक्ष, संघटना, सामाजिक कार्यकर्ते यांच्या कार्यक्रमांचे शुभेच्छांचे होर्डिग्ज बॅनर नेहमीच झळकत असतात. त्यामुळे शहराच्या विद्रुपीकरणात दिवसेंदिवस भर पडत आहे. त्यात पालिकेची २०२२ मध्ये सार्वत्रिक निवडणूक होणार असल्याने राजकिय पक्षांसोबत नविन चेहऱ्यांना संधी, प्रती स्पधींचे होर्डिग्ज, बॅनर आत्तापासूनच झळकायला सुरुवात झाली आहे.

त्यामुळे महापौर लीलाबाई आशान यांनी त्यांच्या दालनात आयुक्त डॉ. राजा दयानिधी, पदाधिकारी, गटनेते यांच्यासोबत बैठक घेतली. यावेळी अनधिकृत होडिंग्ज, बॅनर, पोस्टर लावण्यासाठी पालिकेच्या मालमत्ता विभागातून रितसर परवानगी घेणे आवश्यक आहे. अन्यथा जे अनधिकृत आहेत. अशांवर सबंधित पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्याचे आदेश महापौर लीलाबाई आशान यांनी दिले.

त्यानुसार आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी चारही प्रभागातील सहायक आयुक्त गणेश शिंपी, अनिल खतुरानी, अजित गोवारी, महेंद्र पंजाबी यांना अनधिकृत होडिंग्ज बॅनर बाजांवर एफआयआर दाखल करण्याचे आदेश जारी करणार आहेत.

यावेळी बैठकीला उपमहापौर भगवान भालेराव, सभागृह नेते भारत गंगोत्री, विरोधी पक्षनेते किशोर वनवारी शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र चौधरी, धनंजय बोडारे, अरुण आशान, कलवंतसिंग सोहता, मुख्यालय उपआयुक्त अशोक नाईकवाडे, शहर अभियंता महेश सीतलानी, मालमत्ता व्यवस्थापक विशाखा सावंत, गटनेते जमनादास पुरसवानी आदी उपस्थित होते.

Comments
Add Comment