
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ५ सामन्यांची टी-२० मालिका ९ जूनपासून सुरू होत आहे. पहिला टी-२० सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या टी-२० मालिकेसाठी अनेक भारतीय दिग्गजांना विश्रांती देण्यात आली आहे. या मालिकेसाठी भारतीय निवड समितीने १८ खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे.
रोहित शर्माच्या अनुपस्थितीत कर्णधारपदाची जबाबदारी केएल राहुलकडे सोपवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत आता भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी पहिल्या टी-२० सामन्यासाठी त्यांच्या प्लेइंग इलेव्हन निवडली आहे. रवी शास्त्री यांनी निवडलेल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये केएल राहुल आणि ऋतुराज गायकवाड यांची सलामीवीर म्हणून निवड केली आहे. ईशानला सलामीवीर म्हणून ब्रेक द्यावा किंवा त्याने तिसऱ्या क्रमांकावर प्रयत्न करू शकतो. चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर, पाचव्या क्रमांकावर ऋषभ पंत आणि त्यानंतर हार्दिक पांड्या फलंदाजीला यांची निवड केली आहे.
फिरकी गोलंदाजीसाठी अक्षर पटेल आणि युझवेंद्र चहल यांची निवड केली आहे. दुसरीकडे, रवी शास्त्रीने वेगवान गोलंदाजीसाठी भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले आहे. अर्शदीप किंवा उमरानला या दोघांना प्लेइंग इलेव्हनमध्ये ठेवू शकता. भारतीय संघाला या वर्षी आशिया कप आणि टी-२० विश्वचषक यांसारख्या मोठ्या स्पर्धा खेळायच्या आहे. अशा परिस्थितीत युवा खेळाडूंना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चांगली कामगिरी करून निवडकर्त्यांच्या नजरेत येण्याची चांगली संधी आहे.
रवी शास्त्री प्लेइंग इलेव्हन केएल राहुल, रुतुराज गायकवाड, ईशान किशन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह/उमरान मलिक, हर्षल पटेल.