Tuesday, May 6, 2025

क्रीडा

हंगामात बटलरच्या ८०० धावा पूर्ण

हंगामात बटलरच्या ८०० धावा पूर्ण

अहमदाबाद (वृत्तसंस्था) : राजस्थानचा सलामीवीर जोस बटलरने यंदाच्या हंगामात कमालीची फलंदाजी करत आपल्या संघाला अंतिम सामन्यापर्यंत पोहचवले आहे. बटलरने अप्रतिम फलंदाजी करत यंदाच्या हंगामात ८०० धावांचा टप्पा ओलांडण्याची कामगिरी केली आहे.

शुक्रवारी क्वालिफायर २ सामन्यात राजस्थानने बंगळूरुला नमवत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. या सामन्यात बटलरने हंगामातील चौथे शतक झळकावले आहे. त्याने ६० चेंडूंत १०६ धावांची कामगिरी केली. १७६ च्या स्ट्राईक रेटने खेळत बटलरने आपल्या खेळीत १० चौकार आणि ६ षटकार ठोकले.

बटलरच्या खेळीमुळे राजस्थानने सहज विजय मिळवला. या १०६ धावांमुळे राजस्थानने यंदाच्या हंगामात ८०० धावांचा टप्पा ओलांडला असून त्याच्या खात्यात ८२४ धावा झाल्या आहेत. दरम्यान राजस्थानने बंगळूरुला नमवत अंतिम फेरीत प्रवेश केला.

Comments
Add Comment