Wednesday, May 14, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित

राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा बहुचर्चित ५ जून रोजीचा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. राज ठाकरे यांनी ट्विट करत आपला दौरा स्थगित करण्यात आल्याचे जाहीर केले आहे. प्रकृतीच्या कारणास्तव ठाकरेंचा दौरा तूर्तास स्थगित करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. दौऱ्याची पुढील तारीख ही लवकरच जाहीर करण्यात येईल अशी माहिती समोर येत आहे.

अयोध्या दौऱ्याबाबत ठाकरे यांनी ट्विट करत म्हटले, "तूर्तास अयोध्या दौरा स्थगित... महाराष्ट्र सैनिकांनो, या! यावर सविस्तर बोलूच... रविवार दि. २२ मे, सकाळी १० वा. स्थळ - गणेश कला क्रीडा केंद्र, पुणे"

https://twitter.com/RajThackeray/status/1527507013886177280

ठाकरेंनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केल्यानंतर मनसैनिकांनी जय्यत तयारीला सुरुवात केली होती. पण उत्तर प्रदेशातून राज यांच्या दौऱ्याला विरोध करण्यात आला. भाजपाचे खासदार बृजभूषण चरण सिंह यांनी राज ठाकरेंनी आधी उत्तर भारतीयांची माफी मागावी त्यानंतरच अयोध्येला यावं अशी मागणी केली. बृजभूषण सिंह यांनी याच पार्श्वभूमीवर मोठे शक्तीप्रदर्शन देखील केले. तसेच ५ जून रोजी अयोध्येत राज ठाकरेंना येऊ देणार नाही. त्यासाठी ५ लाख लोक राज ठाकरेंना अडवतील, असे सिंह यांनी म्हटले आहे.

Comments
Add Comment