Monday, May 5, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

ठाकरे सरकारने वाढवली राज ठाकरे यांची सुरक्षा

ठाकरे सरकारने वाढवली राज ठाकरे यांची सुरक्षा

मुंबई : धमकीच्या पत्राच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. राज ठाकरे यांच्या सुरक्षेचा दर्जा पूर्वीचाच वाय+ असणार आहे. मात्र त्यांच्या सुरक्षेतील ताफ्यात पोलिसांची वाढ करण्यात आली आहे. राज ठाकरे यांच्या सुरक्षेच्या ताफ्यात एक पोलिस अधिकारी आणि एक पोलिस अंमलदार वाढविण्यात आला आहे.

भोंगेविरोधी आंदोलनच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी जीवे मारण्याच्या धमकीची पत्रे आली होती. यासंबंधी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली होती. त्यानंतर राज ठाकरेंच्या सुरक्षेविषयी गृहमंत्री वळसे पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली. आज अखेर राज्य सरकारने राज ठाकरे यांची सुरक्षा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

Comments
Add Comment