
माहीम दर्ग्याचे विश्वस्त सोहेल खंडवाणींची मालमत्ता जप्त
मुंबई : एनआयएच्या पथकाने मुंबईच्या माहीममध्ये ४ ठिकाणी छापेमारी केली आहे. माहीम दर्ग्याचे विश्वस्त सोहेल खंडवाणी यांच्या मालमत्तावरही छापेमारी करण्यात आली आहे. तसेच बाबा फालुदाचे मालक अस्लम सोरटिया यांच्या मालमत्तांवरही छापेमारी करण्यात आली आहे.
मुंबईतील दाऊदशी संबंधित २९ ठिकाणांवर एनआयएचे छापे
मुंबईत दाऊदशी संबंधित सध्या २९ ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली असून ग्रॅंट रोड परिसरात एनआयएने कारवाई केली असल्याने खळबळ निर्माण झाली आहे.