Saturday, May 10, 2025

महामुंबईमनोरंजनरिलॅक्सताज्या घडामोडी

किरण माने यांनी घेतली शरद पवार यांची भेट

किरण माने यांनी घेतली शरद पवार यांची भेट मुंबई : राजकीय भूमिका घेतल्याने सिने अभिनेते किरण माने  यांना 'मुलगी झाली हो' या सिरियलमधून काढून टाकण्यात आलं. यामुळे मनोरंजन विश्वात आता खळबळ उडाली आहे. एखाद्या अभिनेत्याला जर अशी वागणूक दिली जात असेल तर ही दडपशाही आहे. याप्रकरणी किरण माने यांना सर्वच स्तरातून समर्थन  मिळत आहे. या भेटीबद्दल किरण माने म्हणाले की,  माझी बाजू मी शरद पवार यांच्या समोर मांडली आहे. माझ्यावर जो अनन्या झाला आहे याबाबत शरद पवार यांच्याशी बोलायला हवं असं मला वाटलं म्ह्णून मी आज येऊन भेट घेतली. कारण माझ्यावर ज्याप्रकारे अन्याय झाला आहे तो सांस्कृतिक दहशतवादाचं उदाहरण आहे.' पुढे ते म्हणाले,  या विषयी भाजप मधील वरिष्ठांशी मी बोलणार आहे. उदयनराजे भोसले यांच्याशी संपर्क साधला परंतु ते गोव्यात आहेत म्ह्णून बोलणं होऊ शकलं नाही. आज ते येतील. उद्या आमची भेट होणार आहे. आता चेंडू स्टार प्रवाहाच्या कोर्टात आहे . माझ्यावर एका महिलेने आरोप केले असं त्यांचं म्हणणं आहे. मग गुन्हा दाखल करावा. चॅनलने अजून का केला नाही? शरद पवार यांनी माझी बाजू सविस्तरपणे ऐकून घेतली. जवळपास दीड तास चर्चा झाली. सध्या त्यांनी यावर काही प्रतिक्रिया दिली नाही. मला आशा आहे मला न्याय मिळेल. स्टार प्रवाहने एकदा स्पष्ट केलं की, मी देखील पुढं काय करायचं? याबाबत निर्णय घेईल. कलाकारावर अनन्या होत असेल, तर राज्यात देखील मराठी चित्रपट महामंडळ आहे त्यांच्याकडे देखील आम्ही जाऊ'
Comments
Add Comment