Thursday, May 8, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

घाटकोपरमध्ये ५२३५ मुलांचे लसीकरण

घाटकोपरमध्ये ५२३५ मुलांचे लसीकरण घाटकोपर (वार्ताहर) :एकीकडे राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे महानगर पालिकेकडून १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण वेगाने सुरू आहे. या लसीकरण मोहिमेत युवा वर्गाचा प्रतिसाद ही मिळताना दिसतो आहे. घाटकोपरच्या रामनिरंजन झुनझुनवाला कॉलेजमध्ये एन वार्ड महानगर पालिकेतर्फे लसीकरण सुरू आहे. घाटकोपर विभागात गुरूवारी दिवसभरात ५२३५ मुलांचे लसीकरण करून घेतले असल्याची माहिती एन वार्ड सहायक आयुक्त संजय सोनावणे यांनी दिली. सहाय्यक आयुक्त संजय सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी महेंद्र खंदारे यांच्या देखरेखीत लसीकरण सुरू आहे.
Comments
Add Comment