Tuesday, May 6, 2025

महामुंबईमहत्वाची बातमी

‘ओमायक्रॉन’ला घाबरू नका; लसीकरणास प्राधान्य द्या

‘ओमायक्रॉन’ला घाबरू नका; लसीकरणास प्राधान्य द्या

उरण: कोरोनाचे संकट येऊन आज ३ वर्षे होऊनही जनतेच्या मानगुटीवर बसलेले भूत उतरण्याचे नाव घेत नाही. आता तर ओमायक्रॉनच्या रूपाने तिसरी लाट आली आहे. त्यामुळे जनतेत भीतीचे वातावरण पसरले आहे. या आजाराची लक्षणे साधी असली तरी वेळीच उपचार केला तर रुग्ण बरा होऊ शकतो. कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटमुळे सगळीकडे भीतीचे वातावरण पसरले आहे. तथापि,ओमायक्रॉन या आजाराला घाबरून न जाता लसीकरणास प्राधान्य देऊन दिलेल्या नियमांचे पालन केले तर धोका कमी आहे. सर्दी, खोकला व ताप असेल तर रुग्णांनी त्वरित डॉक्टर उपचार करून घ्यावेत, असे आवाहन उरणमधील सुप्रसिद्ध डॉ. सत्या ठाकरे यांनी जनतेला केले आहे.

दिवसागणिक याचा संसर्ग वाढत चालला असून रुग्णसंख्येत वाढ होत आहे. तुम्हाला सर्दी सारखी लक्षणे दिसत आहेत; जसे की, श्वासोच्छवास करताना फुरफूर आवाज, डोकेदुखी, सर्दी, अंगदुखी, सांधेदुखी आणि थकवा येणे ही लक्षणे असल्यास कोविडच्या ओमायक्रॉन प्रकारासाठी तुम्ही पॉझिटिव्ह असण्याची शक्यता आहे. वरील लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत. जरी पॉझिटिव्ह आलात तरी व्यवस्थित नियमांचे पालन केले तरी घरी राहून रुग्ण बरा होऊ शकतो. तसेच आजार होऊ नये म्हणून घराबाहेर पडताना तोंडावर मास्क लावणे, गर्दीत जाणे टाळावे, हात स्वच्छ धुवावेत. तसेच लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. ज्याने लसीचे दोन डोस घेतले आहेत, त्यांना हा आजार झाला तरी धोका कमी असतो. मात्र ज्यांनी डोस घेतले नाहीत त्यांना याचा अधिक त्रास होण्याची शक्यता आहे. म्हणून या आजाराला घाबरून न जाता त्याचा नियमानुसार पालन केले तर आजार होण्याचा धोका कमी आहे.

Comments
Add Comment