
मुरबाड : मुरबाड तालुक्यातील मुरबाड आरोग्य विभागाच्या वतीने १५ ते १८ वर्षांच्या मुलांच्या लसीकरणाला मुरबाड ग्रामीण व शहरी भागात जोरदार प्रतिसाद मिळत आहे. तालुक्यात ४ ते ५ दिवसांमध्ये जवळपास एकूण ६०६३ मुलांपैकी ३२०७ मुलांनी लसीकरणाचा लाभ घेतला आहे. यावेळी मुलांच्या लसीकरणाला पालक व विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती मुरबाड तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भारती बोटे यांनी दिली.
४ ते ५ दिवसात मुरबाड म्हसा रुग्णालय : ८७८ विद्यार्थी, शिवले प्राथमिक आरोग्य केंद्र : ५०७ विद्यार्थी, सरळगाव ४९३ विद्यार्थी, नारिवली १२० विद्यार्थी, धसई ५५८, किशोर प्राथमिक आरोग्य केंद्र ४०४ विद्यार्थी, तुळई १९० विद्यार्थी, असे मिळून सध्याच्या घडीला मुरबाड तालुक्यात पंधरा ते अठरा वर्षांच्या वयोगटातील ३२०७ मुलांनी लसीकरणाच्या पहिल्या डोसचा लाभ घेतला आहे.