
मुंबई : मुंबईकरांचं स्वस्त घराचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार असल्याचं दिसतंय. कारण म्हाडाची जुलै महिन्यात निघणारी लॉटरी ही सर्वसामान्यांना परवडतील अशी आहे. म्हाडा आता जुलै महिन्यांत गोरेगाव परिसरात 4 हजार घरांची लॉटरी काढणार आहे. मुंबईच्या उपनगरात म्हाडाकडून सर्वसामान्यांना परवडतील अशी वन बीएचके घरे उभारली जात आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून काढण्यात येणाऱ्या घरांच्या लॉटरीत अत्यल्प गटाकरिता सुमारे दोन हजार घरांचा समावेश असणार आहे. पहाडी गोरेगाव येथे वन बीएचके आकाराची असणारी ही घरे अगदी परवडणाऱ्या किंमतीत म्हणजे 22 लाखांत उपलब्ध होणार आहेत.
मध्यम उत्पन्न गटासाठी 227 घरे आहेत. क्षेत्रफळ ७९४.३१ चौरस फूट असेल. याची किंमत 56 लाख आहे. उच्च उत्पन्न गटासाठी 105 घरे. त्याचे क्षेत्रफळ 178.56 चौरस फूट असेल. याची किंमत 69 लाख असेल.