Wednesday, May 7, 2025

क्रीडामहत्वाची बातमी

कोहली तिसऱ्या कसोटीत खेळू शकतो : द्रविड

कोहली तिसऱ्या कसोटीत खेळू शकतो : द्रविड जोहान्सबर्ग : भारताचा नियोजित कर्णधार विराट कोहली सध्या तंदुरुस्त असून तो तिसऱ्या सामन्यात खेळू शकतो, असे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने म्हटले आहे. कोहली पूर्णपणे तंदुरुस्त असावा. मी नेटमध्ये त्याचा सराव करून घेईन. आशा आहे की केपटाऊनमधील काही नेट्स सत्रांनंतर तो खेळण्यासाठी तयार होईल. मी फिजिओशी जास्त बोललो नाही, पण कोहलीच्या फिटनेसमध्ये खूप सुधारणा होत आहे आणि चार दिवसांचा कालावधी आहे आणि तोपर्यंत तो पूर्णपणे तंदुरुस्त झाला पाहिजे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत दुखापतीमुळे विराट खेळू शकला नव्हता. त्याच्या अनुपस्थितीत लोकेश राहुलने संघाची धुरा सांभाळली. मात्र, पाहुण्यांची फलंदाजी ढेपाळली आणि भारताला पराभव पाहावा लागला. दमदार विजयासह द. आफ्रिकेने तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. उभय संघांमध्ये ११ जानेवारीपासून निर्णायक तिसरी आणि अंतिम कसोटी रंगणार आहे.
Comments
Add Comment