Monday, May 5, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

मुरबाड नगरपंचायत निवडणूक

मुरबाड नगरपंचायत निवडणूक मुरबाड : मुरबाड नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक दुसऱ्या टप्प्यात होणार असून या मतदानासाठी नामनिर्देशन पत्र भरण्याच्या शेवटच्या दिवशी ३० नामनिर्देशन अर्ज दाखल झाले होते; परंतु छाननीमध्ये ७ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत. ओबीसी आरक्षणामुळे मुरबाड नगरपंचायतीमधील प्रभाग क्रमांक २, ५, १२, १७ या प्रभागाच्या निवडणुका १८ जानेवारी २०२२ रोजी होत आहेत. या चार प्रभागांतून निवडणुकीत ३० उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. मात्र छाननीमध्ये सात उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत. तसेच या चारही जागा भाजप-शिवसेनेने प्रतिष्ठेच्या बनवल्या आहेत. त्यामुळे उमेदवारी माघार घेण्याची १० जानेवारी ही तारीख असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुरबाड शहरात प्रचाराची धुळवड पाहायला मिळणार आहे. दरम्यान प्रभाग क्रमांक ५मध्ये भाजपचे उमेदवार तथा माजी नगराध्यक्ष किसन कथोरे यांच्या विरोधात शिवसेनेचे विनोद नार्वेकर उभे असल्याने खरी लढत या प्रभागांमध्ये पाहायला मिळणार आहे.
Comments
Add Comment