Tuesday, May 13, 2025

महामुंबईमहत्वाची बातमी

पोलीस दलात कोरोनाचा शिरकाव

पोलीस दलात कोरोनाचा शिरकाव भाईंदर : मीरा-भाईंदरमधील पोलीस दलात कोरोनाने शिरकाव केला आहे. महापालिका मुख्यालयातील ४ अधिकारी व २ कर्मचारी तसेच मीरा-भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयातील १० पोलीस अधिकारी व २० पोलीस कर्मचारी कोरोना बाधित झाले आहेत. त्यामुळे मंगळवारी काशिमीरा वाहतूक पोलीस ठाण्यात सर्व पोलीस अधिकारी, अंमलदार, कर्मचारी, ट्रॅफिक वार्डन यांची पालिकेच्या डॉक्टर व नर्स यांच्याद्वारे कोविड तपासणी करण्यात आली. यावेळी एकूण १११ अधिकारी, अंमलदार, कर्मचारी तसेच १५० ट्रॅफिक वार्डन यांची तपासणी करण्यात आली.
Comments
Add Comment