
मुंबई : नवीन वर्षात सोन्याची खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी खुशखबर आहे. कारण गेल्या 6 वर्षात प्रथमच सोन्याच्या किंमतीमध्ये घट झाली आहे. त्यामुळे सोने खरेदी करण्याची मोठी संधी ग्राहकांना मिळणार आहे. 10 ग्रॅम सोने खरेदीसाठी ग्राहकांना आता 48 हजार 83 रुपये द्यावे लागणार आहेत.
सोन्याचे दर हे 56 हजार 200 च्या आसपास पोहोचले होते. मात्र, आता 8 हजार रुपयांनी सोन्याच्या दरात घसरण झाल्याने नागरिकांनी सोने खरेदीची एक चांगली संधी मिळाली आहे. ही गेल्या सहा वर्षांतील सोन्याच्या किंमतीतील सर्वात मोठी घसरण असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे 2021 मध्ये सोन्याच्या किंमतीत 4 टक्क्यांनी घसरण झाली आहे.