Tuesday, May 6, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

संपकरी एसटी कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा झटका

संपकरी एसटी कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा झटका सोलापूर : गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचारी विलीनीकरण करा, अशी मागणी करणारे कर्मचारी महेश बाबूराव सलगर यांना संपात सक्रिय असताना हृदयविकाराचा झटका आल्याची घटना घडली आहे. संपात सहभागी झाल्यामुळे एसटी प्रशासनाने त्यांची बदली केली होती. पंढरपूर ते बार्शी अशी त्यांची बदली केल्यानंतर ते अनेक दिवस त्रस्त होते. मात्र सलगरे हे विलीनीकरणाच्या दुखवट्यामध्ये सामील होते. यामुळे १८ डिसेंबरपासून ताण आल्याने अश्विनी सहकारी रुग्णालय कुंभारी येथे दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी ही शस्त्रक्रिया करण्यात आली. पुन्हा त्यांना मूत्रविकाराचा त्रास होत असल्याने रघोजी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत. पुन्हा हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगण्यात आले.
Comments
Add Comment