Monday, May 5, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज टास्क फोर्सची बैठक

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज टास्क फोर्सची बैठक मुंबई :  मुख्यमंत्र्यांच्या (Cm Uddhav Thackeray) उपस्थितीत आज टास्क फोर्सची बैठक होत आहे. त्यात कोरोना निर्बंधाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे सरकार सतर्क झालं. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या टास्क फोर्सच्य़ा बैठकीकडे लक्ष लागून आहे. या बैठकीत वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर निर्बंध वाढवण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.  दुसरीकडे आज मंत्रिमंडळ बैठक रद्द करण्यात आली आहे. काल राज्यात 3900 नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. ओमायक्रॉनचे देशातले सर्वात जास्त रूग्ण दिल्लीनंतर महाराष्ट्रात आहेत. ही तिसऱ्या लाटेची सुरूवात असू शकते असं तज्ञांचं मत आहे. दिल्लीत ओमायक्रॉनचे 263 रुग्ण, तर महाराष्ट्रात 252 रुग्ण सापडले आहेत. पार्श्वभूमीवर आज टास्क फोर्सच्या  बैठकीत काही नवीन निर्णय होतील का? याकडे लक्ष लागून आहे.
Comments
Add Comment