Tuesday, May 6, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीरत्नागिरी

चिपळूणच्या महापुराबाबत सरकारकडून दखल

चिपळूणच्या महापुराबाबत सरकारकडून दखल

रत्नागिरी : कोकणात चिपळूणमध्ये जुलैमध्ये झालेल्या महापुरामुळे होत्याचे नव्हते झाले. कोट्यवधींचे नुकसान झाले. त्यावरून वाशिष्ठी, शिवनदीतील गाळ काढण्याचा विषय सलग दोन दिवस हिवाळी अधिवेशनात आमदारांनी लक्षवेधीद्वारे उपस्थित केला. भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनीही विधानपरिषदेत हा मुद्दा उपस्थित केला.सरकारने केलेली ९ कोटी रुपयांची तरतूद अपुरी आहे. सगळा गाळ काढण्यासाठी दोन वर्षे लागतील. अंदाजित ३५० कोटी रुपये इतका खर्च येणार आहे.

नद्यांमधील गाळ वेळेत काढला नाही तर येत्या पावसाळ्यात चिपळूण शहर पुन्हा पाण्याखाली जाईल, ही गंभीर बाब सरकारच्या लक्षात आणून दिली. त्यावेळी आपत्ती व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी योग्य ती कार्यवाही करून निधीसाठी पाठपुरावा केला जाईल. गाळ काढण्यासाठी काही परवानग्या आवश्यक आहेत. या सगळया विषयाची दखल सरकारने घेतली असून, आवश्यक तो पाठपुरावा वित्तविभागाकडे केला जाईल, असे आश्वासन त्यांनी सभागृहात दिले.

तरी गाळ काढण्यासाठी एकंदरीत ३५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा, अशी मागणी लाड यांनी केली. चिपळूण बचाव समितीचे गेल्या १८ दिवसांपासून येथील प्रांत कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू आहे. याविषयी त्यांनी सभागृहात सांगितले की, वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्यासंदर्भात चिपळूण बचाव समिती आणि नागरिकांचे साखळी उपोषण सुरू आहे. प्रशासनाने ७० हजार कोटी घनमीटर गाळ काढण्याचा अहवाल सादर केला आहे. मात्र, चिपळूण बचाव समितीने केलेल्या सर्वेक्षणानुसार सुमारे तीन लाख ७६ हजार कोटी घनमीटर गाळ काढावा लागणार आहे.

Comments
Add Comment