Monday, May 5, 2025

महाराष्ट्रमहत्वाची बातमी

थंडीची तीव्रता कायम

थंडीची तीव्रता कायम

नाशिक (प्रतिनिधी) : जिल्ह्यामध्ये दुसऱ्या दिवशीही थंडीची तीव्रता कायम आहे.मंगळवारी सकाळी जिल्ह्याचे तापमान १०.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. थंडीमुळे नाशिककर गारठून गेले आहेत. जिल्ह्यामध्ये सर्वात कमी तापमान निफाडमध्ये नोंदविण्यात आले आहे.

उत्तर भारतामध्ये थंडीची लाट निर्माण झाल्याने त्याचा परिणाम हा उत्तर महाराष्ट्रावरही होत असून थंडीची तीव्रता वाढत आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये थंडीची तीव्रता मोठ्या प्रमाणावर ती वाढली असून दोन दिवसांमध्ये तापमान पाच अंश सेल्सिअसने कमी होऊन सोमवारी सकाळी १०.४ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले.

थंडीची तीव्रता वाढल्यामुळे शहरातील नागरिकांनी वेगवेगळ्या मैदानांवर व्यायाम करण्यासाठी तसेच जॉगिंगसाठी गर्दी केली. तर जागोजागी शेकोट्या देखील पेटविण्यात आल्याचे दिसून येत होते. जिल्ह्यामध्ये सर्वात कमी तापमान निफाडमध्ये नोंदविण्यात आले असून निफाडमध्ये सोमवारी सकाळी ७.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले आहे. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी द्राक्ष वाचविण्यासाठी आता शेकोटी चा सहारा घेतला आहे.

Comments
Add Comment