Thursday, May 8, 2025

देशताज्या घडामोडी

श्रीनगरमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार

श्रीनगर : श्रीनगरच्या रंगरेथ भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. या भागात अजून काही दहशतवादी असल्याची माहिती मिळत आहे. या भागात मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आला आहे.

श्रीनगरच्या रंगरेथमध्ये दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. या माहितीवरून सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आणि शोध मोहीम सुरू केली. सुरक्षा दलाने कडक घेराव घातल्याचे पाहून दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला.

मात्र संयम दाखवत दहशतवाद्यांना शरण येण्यास सांगण्यात आले. त्यासाठी त्यांना अनेकवेळा संधीही दिली. तरीसुद्धा दहशदवाद्यांनी गोळीबार सुरूच ठेवल्यामुळे सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिले. यात दोन दहशतवादी ठार झाले. त्यांची अद्याप ओळख पटलेली नाही.

Comments
Add Comment