
मुंबई: करतरीना आणि विकी कौशल यांच्या लगनाची उत्सुकता तिच्या फॅन्सला होती..या शाही सोहळ्याची एक झलक पाहण्यासाठी तिचे फॅन्स आतूर होते. तिच्या लग्नाचे काही खास फोटो कतरीनाने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
हा फोटो शेअर करताना कतरीनाने आपल्या बहिणींबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. आम्ही बहिणींनी नेहमीच एकमेंकांना प्रोटेक्टेट केलं. एकमेकांचे नेहमीच आम्ही आधारस्तंभ राहिलो. आणि ही नात्याची विण अशीच घट्ट राहू देत असं कतरीनाने तिच्या कॅप्शनमध्ये लिहलं आहे.
मेहंदीच्या दिवशीचा खास फोटोही तिने तिच्या इन्टाग्रामवर शेअर केलाय...यात विकी बरोबर ती ताल धरताना दिसतेय...
हळदीच्या दिवशीदेखील कतरीना आणि विकीने एकमेकांना हळद लावून या आनंदात आणखीच भर घातली. हा फोटो शेअर करताना कतरिनाने कॅप्शनमध्ये म्हटलं की, शुक्र, सब्र, खुशी.