Tuesday, May 6, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

गोंदियात लस घेतल्याशिवाय पगार नाही

गोंदियात लस घेतल्याशिवाय पगार नाही

गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात कोविड लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी आता थेट ‘अॅक्शन मोड’वर येत लस न घेणार्या अधिकारी व कर्मचार्यांचे वेतन नामंजूर करण्याचे आदेश जिल्हा कोषागार कार्यालयास दिले आहे. त्यामुळे आता वेतन देयकासाठी लसीकरणाचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.

गोंदिया जिल्ह्यात कोविड लसीकरणाचे प्रथम डोसचे प्रमाण 89 टक्के आहे. अजूनही जिल्ह्यात 11 टक्के पात्र नागरिक लसीकरणापासून वंचित आहेत. जिल्ह्यातील कोविड लसीकरणाचे प्रमाण 100 टक्के होण्याच्या दृष्टिकोनातून सर्व विभाग प्रमुखांनी आपल्या अधिनस्त कार्यरत अधिकारी व कर्मचार्यांचे कोविड लसीकरण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र कोषागार कार्यालयात पाठवावे. ज्या अधिकारी, कर्मचार्यांचे लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र सादर होणार नाही, त्यांचे माहे डिसेंबर 21 वेतन अदा करण्यात येणार नाही. यासंदर्भातचे पत्र जिल्हाधिकार्यांनी जारी केले आहे. या आदेशाने कर्मचार्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Comments
Add Comment