
मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाच्या ओमायक्रॉन या नव्या उत्परिवर्तित विषाणूच्या पार्श्वभूमीवर पालिका सतर्क झाली असून मुंबईत आता कोरोना चाचण्या वाढविण्यात येणार आहेत. यासाठी पालिका रॅपिड अँटिजेन चाचण्यांचे २० लाख किट खरेदी करणार आहे. या चाचण्यांमुळे अवघ्या अर्ध्या तासात संसर्ग झाला की नाही? याची माहिती मिळणार आहे.
Omaicron: Municipal tests to be increased ओमायक्रॉनमुळे जगभरात चिंता पसरली असताना मुंबईत पालिकेकडून खबरदारी घेण्यात येत आहे. मुंबईत आतापर्यंत ३ ओमायक्रॉनचे रुग्ण आढळल्यानंतर पालिकेतर्फे आता कोरोना चाचण्या वाढविण्यात येणार आहेत. यासाठी पालिका २० लाख अँटिजेन चाचण्यांचे किट खरेदी करणार आहेत. हे एक किट पालिकेला ९ रुपयांना मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या किटमुळे कोरोनाचा संसर्ग झाला आहे की नाही? याची माहिती अवघ्या अर्ध्या तासात मिळणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर उपचार करणे शक्य होणार आहे.
या चाचण्या गर्दीच्या ठिकाणी होणार असून मॉल, रेल्वे स्टेशन, बस स्थानक, मार्केट परिसर अशा ठिकाणी चाचण्या होणार आहेत.