Thursday, May 8, 2025

कोकणमहाराष्ट्ररायगड

कर्जत येथे मशिदीमध्ये लसीकरण शिबीर

कर्जत येथे मशिदीमध्ये लसीकरण शिबीर

कर्जत (वार्ताहर) : मुस्लिम मस्जिद ट्रस्ट कर्जत, लसीकरण संघर्ष समिती, कर्जत नगरपरिषद व उपजिल्हा रुग्णालय कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने मशिदीमध्ये शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी २३५ जणांनी लसीकरण करून घेतले. सर्व जाती-धर्मांच्या लोकांनी मशिदीमध्ये येऊन लसीकरण करून घेतले. विशेष म्हणजे सर्व महिलांनी लसीकरण करून सहभाग नोंदवला.

एकता अखंडता व मानवतेचा संदेश त्यामुळे कर्जत तालुक्यात सर्वदूर पसरला. माणुसकी हाच खरा धर्म असतो, हे आजच्या लसीकरण शिबिरामधील लोकांच्या सहभागातून दिसून आले. जीवन हे अमूल्य असून ते जाती-धर्म व पक्षाच्याही पलीकडे आहे. माणुसकीचा धागा हा सर्वाना जोडणारा असतो, हे आजच्या लसीकरण शिबिरातून दिसले.

Comments
Add Comment