Monday, May 5, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

बीडमध्ये पोहायला गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू

बीडमध्ये पोहायला गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू

बीड : बीड जिल्ह्यात वेगवेगळ्या दोन घटनांमध्ये पोहायला गेलेल्या तीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बीडच्या पाली येथील बिंदुसरा प्रकल्पाच्या सांडव्याच्या पाण्यात बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाला असून दुसरीकडे गेवराई तालुक्यातील सुरळेगाव येथील गोदावरी नदीमध्ये बुडून एका तरूणाचा मृत्यू झाला.

ओंकार लक्ष्मण काळे (१६), शिव संतोष पिंगळे (१६) व तान्हाजी लिंबाजी आरबड (१७) असे मृत्यू पावलेल्या तिघांची नावे आहेत. यातील ओंकार काळे आणि शिव पिंगळे हे दोघेही, पाली येथील बिंदुसरा प्रकल्पाच्या सांडव्यातील पाण्याच्या डोहात पोहण्यासाठी गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. ही घटना काल सायंकाळी सातच्या दरम्यान घडली.

तर, गेवराई तालुक्यातील सुरळेगाव येथे सकाळी आठच्या दरम्यान पोहण्यासाठी गेलेला तानाजी आरबड या तरुणाचा देखील गोदावरी नदीच्या डोहामध्ये बुडून मृत्यू झाला आहे. ३ मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेने जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment