Monday, May 5, 2025

क्रीडा

आझमसह झमनची बॅटिंग प्रॅक्टिस

आझमसह झमनची बॅटिंग प्रॅक्टिस

दुबई (वृत्तसंस्था) : कर्णधार बाबर आझमसह (४१ चेंडूंत ५० धावा) वनडाऊन फखर झमनच्या (२४ चेंडूंत नाबाद ४६ धावा) सर्वोत्कृष्ट बॅटिंग प्रॅक्टिसच्या जोरावर टी-ट्वेन्टी वर्ल्डकप सराव लढतींमध्ये सोमवारी पहिल्या सामन्यात पाकिस्तानने वेस्ट इंडिजवर ७ विकेट आणि २७ चेंडू राखून मात केली.

पाकिस्तानने विंडिजचे १३१ धावांचे आव्हान १५.३ षटकांत ३ विकेटच्या बदल्यात पार केले. झटपट सुरुवातीनंतरही रवी रामपॉलने सलामीवीर मोहम्मद रिझवानला (१३ धावा) लवकर बाद केले तरी आझम आणि झमनने दुसऱ्या विकेटसाठी ५८ धावा जोडताना संघाला सावरले. कर्णधार बाबरच्या अर्धशतकामध्ये ६ चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. झमनने २४ चेंडू खेळताना ४ चौकार आणि २ षटकार लगावले.

तत्पूर्वी, वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीसह हसन अली तसेच हॅरिस रौफच्या (प्रत्येकी २ विकेट) नियंत्रित गोलंदाजीमुळे वेस्ट इंडिजला २० षटकांत ७ बाद १३० धावांमध्ये रोखण्यात पाकिस्तानला यश आले. त्यांच्याकडून सर्वाधिक धावा शिमरॉन हेटमायरने केल्या.

Comments
Add Comment