
मुंबई : शिवसेनेचा दसरा मेळावा हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. काल झालेल्या दसऱ्या मेळाव्यातील मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर विरोधी पक्षांनी चांगलीच टोलेबाजी केली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी 'दसरा मेळाव्याच्या दिवशी हिंदुह्रदयसम्राटांचं भाषण म्हणजे असायची पर्वणी, आता मात्र सगळच आळणी. गरम पाण्याच्या नावाखाली नुसतंच कोमट पाणी' असे ट्विट करत उद्धव ठाकरेंच्या भाषणावर टीका केली आहे.
https://twitter.com/SandeepDadarMNS/status/1449193414163980288?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1449193414163980288%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fmaharashtra%2Fmns-sandeep-deshpande-criticised-uddhav-thackeray-over-shiv-sena-dasara-melava-speech-vsk-98-2634306%2F
षण्मुखानंद सभागृहात शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. तेच मुद्दे, त्याच विषयांना धरून मुख्यमंत्र्यांनी भाषण केले. मुख्यमंत्र्यांच्या भाषणामुळे राजकीय वातावरणात विरोधी पक्षांकडून टीकास्त्रे करण्यात येत आहेत. भाजप पक्षाने मुख्यमंत्र्यांच्या प्रत्येक मुद्यावर टीका केली आहे.