Monday, May 5, 2025

महामुंबईपालघर

दसरा असूनही बाजारामध्ये शुकशुकाट

दसरा असूनही बाजारामध्ये शुकशुकाट

नालासोपारा (वार्ताहर) : दसरा असूनही वसई-विरारमध्ये बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला. कोरोनाच्या काळात अनेकांचे नोकरीधंदे गेले आणि त्यामुळे नागरिकांना पूर्वीसारखा महागाईचा सामना करता येत नाही. त्यातही फुले आणि फळांचे दर वाढल्याने नागरिकांना खरेदी करणे कठीण जात होते. दरम्यान, ग्राहकांनी पाठ फिरवल्याने फेरीवालेसुद्धा निराश होते.

दरवर्षी दसऱ्यानिमित्त बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. वसई-विरार स्थानकाबाहेर फूल विक्रेता व फळ विक्रेत्यांची रांग लागलेली असते. यंदाही फेरीवाल्यांनी समान विकण्याची संपूर्ण तयारी केली होती; परंतु नागरिकांचा खरेदीला तितकासा प्रतिसाद मिळाला नाही. कोरोनाचा काळ असताना अनेकांचे नोकरीधंदे गेले आणि त्यामध्येच नागरिकांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागला. यामुळे उभ्या राहिलेल्या आर्थिक टंचाईमुळे बाजारपेठांमध्ये शुकशुकाट असल्याचे पाहायला मिळाले. याचबरोबर फुलांचे दर हे ७० आणि ८० रुपये झाले आहेत. फळेही शंभर रुपये किलोने मिळू लागल्याने नागरिक सध्या हैराण झालेले आहेत. महागाईचे सावट असल्याने तसंच नोकरी धंदा नसून आर्थिक टंचाई असल्याने बाजारपेठांमध्ये शांतता पाहायला मिळाली. ग्राहकांची गर्दी नसल्याने अपेक्षित धंदा न झाल्याने फेरीवालेदेखील निराश होते.

दसऱ्याच्या दिवशी फुलांची आणि फळांची चांगली विक्री होईल, अशी आशा होती. पण तसे झाले नाही. दोन दिवस आधी सामान भरण्यास सुरुवात केली, तरी नागरिकांची गर्दी दिसून आली नाही. - गोपी मारू, फूल विक्रेता

दसऱ्याला चार हजारांपर्यंतच विक्री होते; परंतु, यंदा विक्रीत घट झाली. ग्राहकांनी महागाईचे कारण देऊन कमी सामान घेतले. त्यामुळे धंदा झाला नाही. - अश्विनी बोबडे, फेरीवाले

Comments
Add Comment